येथे तुम्हाला 'नवोदय प्लस' ॲपबद्दलच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतील.
1. कोर्स आणि अभ्यासक्रम
1. 'नवोदय प्लस' चा अभ्यासक्रम इतर क्लासपेक्षा वेगळा कसा आहे?
आम्ही मुलांना रटाळ शिक्षणाऐवजी मनोरंजक पद्धतीने शिकवतो. यासाठी आम्ही 4 पायऱ्यांची पद्धत वापरतो:
संकल्पना: समजण्यासाठी व्हाईट बोर्ड व्हिडिओ, कॉमिक्स आणि ऑडिओ पॉडकास्ट.
सराव: रोजची टेस्ट, गणित गेम्स आणि मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिका.
उजळणी: परीक्षेच्या आधी कमी वेळेत अभ्यासासाठी माइंडमॅप्स आणि फ्लॅशकार्ड्स.
मार्गदर्शन: अभ्यास कसा करावा याचे नियोजन आणि पालकांसाठी चर्चासत्रे.
2. लाईव्ह क्लासेस कधी असतात?
लाईव्ह क्लासेस सोमवार ते शुक्रवार असतात. यासाठी दोन वेळा उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता:
सकाळी 8 ते 9
किंवा सायंकाळी 7 ते 8
जर तुमचा क्लास बुडाला, तर त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपवर कधीही पाहता येते.
3. 'कॉमिक्स' आणि 'पॉडकास्ट'चा अभ्यासात काय उपयोग?
मुलांना वाचून कंटाळा येतो, म्हणून आम्ही अभ्यासाची गोडी लावण्यासाठी चित्रांच्या स्वरूपात कॉमिक्स आणि प्रवासात ऐकण्यासाठी ऑडिओ पॉडकास्ट बनवले आहेत. यामुळे मुले खेळासारखा अभ्यास करतात आणि संकल्पना लवकर लक्षात राहतात.
2. सराव परीक्षा आणि टेस्ट सिरीज
1. मला मोफत टेस्ट देता येईल का?
होय! आम्ही दोन प्रकारच्या मोफत टेस्ट घेतो:
साप्ताहिक घटक चाचणी: दर रविवारी सकाळी 11:30 ते 12:30.
मासिक पूर्ण सराव परीक्षा: महिन्याच्या 4 थ्या रविवारी सकाळी 11:30 ते 1:30.
या टेस्ट सर्वांसाठी खुल्या आहेत.
2. जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील का?
होय, 'प्रो मेंबरशिप'मध्ये आम्ही मागील 16 वर्षांच्या (2011 पासून) सर्व सरकारी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित आणि स्पष्टीकरणासहित देतो.
3. 'एआय शिक्षक' म्हणजे काय?
हा तुमचा 24 तास उपलब्ध असलेला डिजिटल मदतनीस आहे. अभ्यास करताना तुम्हाला कधीही शंका आली, तर तुम्ही 'एआय शिक्षका'ला विचारू शकता आणि क्षणात उत्तर मिळवू शकता. यासाठी शिक्षकांची वाट पाहण्याची गरज नाही.
3. पालकांसाठी
1. माझ्या मुलाची प्रगती मला कशी समजेल?
पालकांसाठी आम्ही खालील सुविधा देतो:
मासिक प्रगती अहवाल: दर महिन्याला मुलाने किती अभ्यास केला, किती मार्क्स मिळाले याचा रिपोर्ट.
पालक-शिक्षक सभा (PTM): दर महिन्याला शिक्षक आणि पालकांची ऑनलाइन मिटिंग.
साप्ताहिक युट्यूब चर्चासत्र: पालकांनी मुलांची तयारी कशी करून घ्यावी, यासाठी दर आठवड्याला मोफत वेबिनार.
4. अकाऊंट, पेमेंट आणि नियम
1. मी माझा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी बदलू शकतो का?
नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आणि डेटा ट्रॅकिंगसाठी, एकदा नोंदणी केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी बदलता येत नाही. कृपया कायमस्वरूपी नंबरच वापरावा.
2. कोर्स फी भरल्यावर पैसे परत मिळतील का?
नाही. आमचे 'नो रिफंड पॉलिसी' आहे. एकदा मेंबरशिप घेतली की ती रद्द करता येत नाही किंवा दुसऱ्या कोणाला हस्तांतरित करता येत नाही.
3. ॲप किंवा पेमेंटमध्ये अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा?
तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता. संपर्क माहिती खाली दिली आहे.